उपमुख्यमंत्र्यांनी शेअर केला स्वत:चा टिकटॉक व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiktok-f

हल्ली टिकटॉक या अॅप्लिकेशनवरून व्हिडीओ तयार करण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढलंय. आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पामुला पुष्पा श्रीवानी यांना देखील टिकटॉक वापरण्याचा मोह आवरलेला नाही. श्रीवानी यांचा एक टिकटॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीवानी या आंध्रप्रदेशच्या आदिवासी विकास मंत्री आहेत. त्या उत्तर आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम जवळील कुरुपम मतदारसंघातील आमदार आहेत. सध्या विशाखापट्टनमला आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे श्रीवानी यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे कौतुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तेलुगू गाण ‘रयालासीमा मुद्दुबिद्दा मना’ हे प्रसिद्ध गाणं वाजत आहे. जगनमोहन रेड्डी यांचे मूळ गाव हे रयालसीमा आहे.