
सामना प्रतिनिधी । पेण
पार्टी विथ डिफरन्स व लोकप्रतिनिधींना चौकीदार म्हणून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पेण येथील पदाधिकारी टक्केवारी घेऊन कामाचा ठेका देत असल्याचा पर्दाफाश खुद्द त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी केला आहे. तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या माध्यमातून आलेली विकासकामे इतरांना विश्वासात न घेता ठेकेदारांना टक्केकारी घेऊन विकत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून तशी लेखी तक्रारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चौकीदारही चोर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पेण तालुक्यात भारतीय जनता पक्ष का काढत नाही आणि पक्षाच्या माध्यमातून विकासकामे का होत नाहीत यासंदर्भात सविस्तर तक्रार भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका सरचिटणीस राजेश पाटील, महिला शहर अध्यक्षा भारती आंद्रे, तालुका अध्यक्षा अनुजा पाटील, कडखळचे सरपंच राजू मोकल यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील यांच्याकडे लेखी स्करूपात केली आहे. खारलँड, सार्वजनिक बांधकाम किभाग, मेरीटाईम बोर्ड आदी विभागातील विकासकामे करण्यासाठी कोटय़वधी रुपये मंजूर झाले, पण ही कामे टक्केवारी घेऊन इतर पक्षाच्या ठेकेदारांना देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या लेखी तक्रारीनंतर पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत उत्तर मिळाले नाही तर पक्षहितासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रदेश कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
चौकशी होणार
नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींची शहानिशा करून जिल्हास्तरावर चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील यांनी दिली.
































































