अंदमानच्या कोठडीत दहा तास राहून दाखवा – देवेंद्र फडणवीस

937

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. सावरकरांविरुद्ध बोलणाऱ्यांनी केवळ दहा तास अंदमानच्या कोठडीत राहून दाखवावे, त्यांना पुरस्कार देतो, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांना दिले. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, संस्थेचे सचिव कृ. म. जोशी, सविता भालेराव, कैलासचंद्र काला, डॉ. सुधीर कोकरे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले आदींची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन अभिनव भारत शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेची पायाभरणी शहीद भगतसिंघ यांच्या मातोश्रींनी केली असल्याने ही मोठी गर्वाची बाब आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून विवेक आणि अविवेक यातील भेद कळायला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या