40 टक्के जागा तरुणांना देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा केली. महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष 40 टक्के जागा 35 वर्षांखालील तरुणांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणे कठीण होणार आहे.

भाजपने वरळीच्या एनएससीआय डोममध्ये युथ कनेक्ट हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी तरुणांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यास भाजपने प्राधान्य दिले आहे.