भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होणार नाही

1454
devendra-fadnavis

भाजप वगळता राज्यात कोणतेही सरकार होऊ शकत नाही अशीच राजकीय स्थिती आहे. त्याचा निर्णय योग्य वेळी पक्ष घेईल, असा दावा भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या आमदारांच्या बैठकीत केला.

आमदारांनी मुंबईत थांबू नये

सर्व आमदारांनी जनतेत जाऊन काम करावे. मुंबईत थांबण्याची गरज नाही. शेतकऱयांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, शेतकऱयांना मदत करावी. शेतकऱयांना भक्कम मदत मिळेल हे निश्चित आहे. सत्तेसाठी भाजप काम करीत नसून, जनतेसाठी काम करणे हे आपले पहिले लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.

राजकीय घडामोडींवर लक्ष

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांत सुरू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून आहे, असे भाजप नेते आशीष शेलार यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या