फडणवीस लवकरच मोठ्या पदावर जातील; भय्याजी जोशी यांच्या शुभेच्छा!

877

राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असणारे देवेंद्र फडणवीस हे लवकरच मोठय़ा पदावर जातील, अशा शुभेच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिल्या. शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या वाटय़ाला आलेले विरोधी पक्षनेते पद हा फार दिवसांचा विषय नाही. माजी मुख्यमंत्री पदही त्यांच्या जीवनात अल्पायुषी असल्याचे प्रतिपादन केले. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यावर फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

लोकशाहीमध्ये सरकार येत-जात असते. मात्र, लोकशाही मध्ये सरकारची खूप मोठी शक्ती असते. लोकच ही शक्ती निर्माण करतात. फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेतेपद हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्री पद ही उपाधी देखील त्यांच्या जीवनात अल्पायुषी असेल. लोकशाही व्यवस्थेत काही गोष्टी कमी-अधिक होत असतात. परंतु, देशाचा सामान्य नागरिक लोकशाही बळकट करण्याचे कार्य करीत राहतो. सामान्य नागरिक जागरूक असला की लोकशाही यशस्वी होत असल्याचे भय्याजी जोशी यांनी नमूद केले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि भय्याजी जोशी एका व्यासपीठावर होते. दरम्यान, जोशी यांनी दिलेल्या शुभेच्छांनंतर आता राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या