
मुंबई-ठाण्याची कनेक्टिव्हिटी वेगवान बनणार आहे. मेट्रो-2 ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा आणि मेट्रो-9च्या दहिसर ते काशीगावपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. दोन्ही मार्गांवर बुधवारपासून प्रवाशी सेवा सुरू होणार आहे. मेट्रो-9 व मेट्रो-7 या मार्गिका दहिसर येथे जोडल्या असल्याने प्रवाशी अंधेरी येथून थेट मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करू शकणार आहेत.



























































