मतांची चोरी करुन सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस हे चिप मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

मतांची चोरी करुन सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस हे चिप मुख्यमंत्री, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत जो माणूस स्वतः चोर मुख्यमंत्री (चो. मु.) आहे, चिप मुख्यमंत्री आहे म्हणून ते असेच चिप वक्तव्य करत आहेत. अशा पद्धतीने खालच्या पातळीवरच्या टीकेने राहुल गांधी यांचे नेतृत्व व कर्तृत्व कमी होत नाही.”