
देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ बोर्डातील डॉ. लांबे यांच्या नियुक्तीवरून फुगवलेला संशयाचा फुगा नवाब मलिक यांची कन्या सना मलिक-शेख हिने लगेचच ट्विट करून पह्डला. फडणवीस आणि लांबे यांच्या गळाभेटीचा फोटो अपलोड करून सना म्हणते, अर्धसत्य हे पूर्ण खोटं असतं. फडणवीस सरकारच्या काळातच 13 सप्टेंबर 2019 रोजी लांबेची वक्फ बोर्डावर नियुक्ती झाली होती. महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये स्थापन झाले आणि माझ्या वडिलांना अल्पसंख्यांक खाते जानेवारी 2020 मध्ये मिळाले. डी गँगचा नातेवाईक व बलात्काराच्या आरोपीसोबत देवेंद्र फडणवीस असेही सनाने टॅग केले आहे.
पेन ड्राइव्ह मीडियाकडे कसा?
विरोधी पक्षाच्या सभात्याग केल्यानंतर भास्कर जाधव यांनी फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी केली. फडणवीस यांनी पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांच्या कस्टडीत दिला होता. अध्यक्ष या पेन ड्राइव्ह बाबत निर्णय घेणार असताना या पेन ड्राइव्हमधील माहिती दुसऱया मिनिटाला विरोधी पक्षनेते सभागृहाबाहेरील मीडियाला सांगतात. अशा प्रकारे ही माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का, असा सवाल करून याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.






























































