देवगड – वागदेत ट्रक, डंपरचा भीषण अपघात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुबंई गोवा महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात कणकवली ते असरोंडी जात असणाऱ्या ट्रक व डंपरचा अपघात झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास वागदे हॉटेल रेड चिली जवळ घडला. ओव्हरटेक करत असताना डंपर व ट्रक एकमेकांना घासून डिव्हायडर क्रॉस करत महामार्गाच्या दुसऱ्या लेनवर येऊन थांबले. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच वागदे ग्रामस्थांसह वाहतूक पोलिस एस.के.कदम, ए. जे. भुतेलो, एस. एस. करवंजे, व्ही. जि. देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने कुडाळच्या दिशेने जाणारे ट्रक व डंपर ओव्हरेटेक करत असताना एकमेकांना घासले. व त्याच वेगाने ते महामार्गाच्या कणकवली कडे वाहने येणाऱ्या लेनवर येऊन थांबले. सुदैवाने या लेन वरून कणकवलीच्या दिशेने त्याच वेळी वाहने येत नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी काही वेळातच अपघातस्थळी धाव घेत दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.अधिक तपास पोलीस करत आहेत.