‘दीड फुटा’ची जादू रोखणार मुंबईतील प्रदूषण, हवेतील विषारी घटक कमी करणारी उपकरणे

दैनंदिन जीवनात ग्लोबल वार्ंमग आणि हवेच्या प्रदूषणाला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. त्याचा दुष्परिणाम मानवी जीवनाबरोबरच पर्यावरणावरही होत आहे. वाहनांच्या इंजिनातून हवेत उत्सर्जित होणाऱया विषारी वायूमुळे ग्लोबल वार्ंमगचा धोका अधिक गंभीर होत चालला आहे. त्यासाठी वाहनांच्या प्रदूषणाला आवर घालणे ही काळाची गरज बनली आहे. पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी हे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘दीड फुटा’ची जादूच शोधली आहे.

वाहनांना असलेल्या 350 ते 750 क्षमतेच्या इंजिनांमध्ये केमिकल एनर्जीचे मेपॅनिकल एनर्जीत रुपांतर होते. वाहने चालण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असली तरी त्यानंतर होणाऱया वायू उत्सर्जनामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आयआयटी मुंबईतील गुरदीतसिंग वोहरा, संतोष पोवार आणि प्रसाद कांबळे यांनी दोन उपकरणे बनवली आहेत. यातील एक उपकरण वाहनांच्या इंजिनमध्ये तर दुसरे रस्त्याच्या कडेला दर शंभर मीटर अंतरावर लावायचे आहे. त्यामुळे प्रदूषणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण आणता येईल, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

या दोन्ही उपकरणांच्या या संशोधकांनी कोल्हापूर येथे यशस्वी चाचण्या केल्या आहेत. त्याबद्दल मध्य रेल्वे आणि शिवाजी विद्यापीठाने त्यांना प्रमाणपत्रेही दिली आहेत. या संशोधकांनी मोठय़ा परिश्रमाने बनवलेली या उपकरणांचा प्रत्यक्षात वापर सुरू झाला तर प्रदूषण कमी करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकणार आहे.

एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर अॅण्ड एमिशन पंट्रोल सिस्टम

इंजिनाला लावल्या जाणाऱया उपकरणाला एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर अॅण्ड एमिशन पंट्रोल सिस्टम (ईजीटीईसीएस) असे नाव देण्यात आले आहे. ईजीटीईसीएस हे उपकरण आयसी इंजिनाला लावायचे आहे. या उपकरणामध्ये सेलो इलेक्ट्रो बार्ंनग युनिट, पुलिंग युनिट आणि फिल्टरिंग युनिट आहे. सेलो इलेक्ट्रो बर्निंग युनिटमध्ये वाहनातून बाहेर पडणाऱया वायूमधील कार्बन 550 अंश ते 650 अंश सेल्सियस तापमानात नष्ट केले जाते. त्यानंतर पुलिंग युनिटमध्ये त्या वायूचे तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत कमी केले जाते आणि फिल्टरिंग युनिटमध्ये त्या वायूमधील सुक्ष्म कण कमी करण्याची क्षमता आहे. या सर्व प्रक्रियेतून बाहेर जाणाऱया वायूमध्ये हवेतील प्रदूषण अत्यल्प होते.

इंजिनाला लावल्या जाणाऱया उपकरणाला एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर अॅण्ड एमिशन पंट्रोल सिस्टम (ईजीटीईसीएस) असे नाव देण्यात आले आहे.

ऋतुमानाप्रमाणे प्रदूषण कमी करण्याची क्षमता

ज्या भागात तापमान आणि वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे तिथे प्रदूषण अधिक होण्याचा धोका असतो. गुरदीतसिंग, संतोष आणि प्रसाद यांनी बनवलेले दुसरे उपकरण अशा भागांमध्ये खांबांवर बसवले जाऊ शकते. हे उपकरण वातावरणातील प्रदूषित तत्त्वे शोषून ते नष्ट करण्याच्या क्षमतेचे आहे. या उपकरणामध्येही सेलो इलेक्ट्रो बार्ंनग युनिट, लिथियम ग्रीझ पोल अॅण्ड ग्रील्स, रेडिएटर आणि एक्झॉस्ट फॅन अशी युनिट्स आहेत. विशेष म्हणजे उन्हाळय़ाच्या काळात या उपकरणात शोषली जाणारी गरम हवा त्यातील प्रदूषण कमी केल्यानंतर थंड होऊन वातावरणात सोडली जाते. तर पावसाळा व हिवाळ्यात हीच हवा गरम करून वातावरणात सोडली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या