देवळाली ते दाणापूर मध्य रेल्वेची किसान स्पेशल ट्रेन धावणार

492

मध्य रेल्वे नाशिकच्या देवळाली ते बिहारच्या दानापूर दरम्यान किसान स्पेशल ट्रेन चालविणार आहे. या वेळापत्रकानुसार धावणाऱ्या किसान विशेष पार्सल एक्सप्रेसमधून शेतकऱयांना त्यांच्याकडील भाज्या, फळे आणि इतर नाशवंत मालाची बुकींग करता येऊ शकणार आहे.

ट्रेन क्र.00107 किसान स्पेशल ट्रेन दि. 7 ते 28 ऑगस्टदरम्यान नाशिकच्या देवळाली येथून दर शुक्रवारी स. 11 वा.सुटेल आणि दुसऱया दिवशी सायं. 6.45 वा.दानापूरला पोहोचेल. ट्रेन क्र. 00108 ही परतीची किसान स्पेशल ट्रेन दि. 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान दर रविवारी दुपारी 12.00 वाजता दानापूर येथून सुटेल आणि दुसऱया दिवशी देवळाली येथे रात्री 7.45 वाजता पोहोचेल. या किसान स्पेशल ट्रेनमध्ये 10 पार्सल व्हॅन आणि एक लगेज कम ब्रेक व्हॅन असेल. ही किसान स्पेशल ट्रेन नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱहानपूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर या स्थानकांवर थांबेल. या गाडीला मागणीनूसार आणखी थांबे देण्यात येणार आहेत.

वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक, भुसावळ – 7219611950, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक, प्रेट सर्व्हीसेस – 8828110963, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, प्रेट सर्व्हीसेस – 8828110983, मुख्य वाणिज्य निरीक्षक, प्रेट सर्व्हीसेस -7972279217

आपली प्रतिक्रिया द्या