सलग सुट्ट्या, एकादशीमुळे पंढरीत हजारो भाविकांची गर्दी

या महिन्यात रविवारी आलेली पुत्रदा एकादशी आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरीत वारकरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने भाविकांनी गर्दी केली होती. गद्री असूनही सर्व व्यवहार सहजतेने आणि सुरळीत सुरू होते.

मागील आठ महिन्यांपासून कोरोना निर्देशांमुळे पंढरीत भाविकांनी प्रवेश नव्हता. मात्र, रविवारी आलेली पुत्रदा एकादशी आणि शनिवार, रविवारची सुट्टी व मंगळवारी आलेली 26 जानेवारीची सुटी यामुळे दोन दिवसांपासून शहरात मोठी गर्दी झाली आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा रोड व वाळवंट येथे वारकर्‍यांसह सुट्टीसाठी आलेल्या भाविकांची मोठी वर्दळ आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 20 जानेवारीपासून देवाच्या दर्शनास ऑनलाईन पास काढण्याची अट रद्द केल्यामुळेही गर्दी वाढली आहे. रविवारी सकाळी दर्शनाची रांग धोंडोपंतदादा मठापर्यंत होती. दिवसभरात हजारो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले.

मागील महिन्यातील मार्गशीर्ष एकादशीपेक्षा आजच्या एकादशीला गर्दी जास्त असल्याचे दिसत होते. यामुळे व्यापार्‍यांना अनेक महिन्यानंतर चांगली कमाई झाली असली तरी अनेक भाविक विनामास्क फिरत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या