
माघी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या श्री मलंगगडावरील श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटू लागली आहे. या गडावर जाण्यासाठी मोठा गाजावाजा करून फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू करण्यात आली. परंतु या ट्रॉलीमध्ये सातत्याने बिघाड होऊ लागला आहे. सोमवारी ही ट्रॉली काही काळ वाटेतच अडकल्याची घटना घडली असताना मंगळवारी पुन्हा ही ट्रॉली गडावर पोहण्याआधीच बंद पडली. त्यामुळे या ट्रॉलीत बसलेल्या भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला. अडकलेल्या भाविकांची सुटका करण्यासाठी दुरुस्ती पथक पोहचले आणि त्यांनी या भाविकांची सुखरूप सुटका केली.





























































