देवरुखात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, तालुक्याची रुग्ण संख्या 91 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील इतर भागात कोरोना पॉझिटिव्ह सापडत असताना देवरुखला मात्र आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नव्हता. आज मात्र देवरुखमध्येच पहिला रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धावपळ झाली.

देवरुखसह पुर गावात आज प्रत्येकी 1 रुग्ण सापडल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 91 वर गेली आहे. आजवर तालुक्यात कोरोनाने 3 बळी घेतले असून 20 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.