
परिसरात काल कोरोनाचे 7 रुग्ण सापडले ह्या पार्श्वभूमीवर आज कोंडगाव साखरपा व्यापारी मंडळाची तातडीची सभा ग्रामपंचायत कोंडगावच्या सभागृहात संपन्न झाली. त्या सभेत आज सोमवार 24 ऑगस्ट ते बुधवार 26 ऑगस्ट 2020 ह्या कालावधीत संपूर्ण बाजारपेठ दुपारी 2 वाजेपर्यंतच उघडी राहील व गुरुवार 27 ऑगस्ट 2020 ते सोमवार 31 ऑगस्ट 2020 पर्यंत संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे कडक बंद राहील व सोमवारी परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असा ठराव सर्वानुमते संमत झाला.
यावेळी कोंडगाव ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समिती सदस्य जया माने, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी मंडळ अध्यक्ष श्रीधर कबनुरकर आणि बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी ही आज दुपारी बंद करून आपापल्या गावी निघून जावे व 15 दिवस इकडे येऊ नये, असाही ठराव करण्यात आला. दूध विक्रेत्यांनी आपली दूध खरेदी गावाबाहेर जाऊन करावी व दूध घरपोच करावे असे ठरले.
























































