गेमिंग प्रेमींसाठी पर्वणी

54
dew-arena-game

सामना ऑनलाईन । एनएससीआय

आपल्या ‘ड्यू अरेना’ या अत्यंत यशस्वी स्पर्धेसह माऊंटन डय़ू पुन्हा आले आहे. ही स्पर्धा अतिशय वेगाने विस्तारत आहे. सन 2016 मध्ये सुरू झालेल्या स्पर्धेत 22,000 स्पर्धकांनी भाग घेतला होता, तर आता 2018 मध्ये ही संख्या 7,00,000वर पोहचली आहे.

निऑन गेमिंग ट्रॅकसोबत ही स्पर्धा 19 ते 23 एप्रिलदरम्यान मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. या ट्रॅकमध्ये 16 गेमस्टेशन्स, व्हीआर हेडसेट्स आहेत. हा टॅक 19 ते 21 एप्रिल रोजी वरळी स्थित नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) तसेच 22 एप्रिल रोजी कांदिवली पूर्व स्थित सिद्धार्थ नगर, तर 23 एप्रिल रोजी भायंदरस्थित फाउंटन हॉटेलजवळ असेल. ही स्पर्धा 7 महिन्यांच्या काळात हरयाणा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसह आठ राज्यांतील 200 ठिकाणी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या