जालना जिल्ह्यातील धामणा धरण ओव्हर फ्लो; 12 गावांचा पाणी प्रश्न मिटला

1242

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण मंगळवारी ओव्हर फ्लो झाले. धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरण शंभर टक्के भरले असून 12 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर पाटबांधारे विभागामार्फत पारधसह धरणाखालील चार गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण परिसरातील वडोद तांगडा,धावडा,शिवना भागात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धामणा धरण शंभर टक्के भरले आणि सांडव्यावरून पाणी पडण्यास सुरूवात झाल्याने रायघोळ नदीला पूर आला. धरणाखालील पारधसह पारध खुर्द, लेहा, शेलूद या गावांना पाटबाधांरे विभागामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धामणा धरण शंभर टक्के भरल्याने धरण परिसरात शेलूद,वडोद, तांगडा, धावडा, पोखरी, भोरखेडा, जळकी, हिसोडा बु., हिसोडा खुर्द, दहीगाव, जळगाव सपकाळ,आन्वा, कोठा कोळी, लेहा,पिंपळगाव रेणुकाई यांच्यासह 12 गावाचा पाणीप्रश्न मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या