
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज ते कोरोना आजारातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंडे यांच्चे खासगी सचिवसह पाच कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेही या आजारातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
12 जून रोजी धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंडे यांचे खासगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक दोन अंगररक्षक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. तेव्हा पासून सर्वांव उपचार सुरू होते. आता धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे खासगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे.
























































