चार वर्ष केली लूट, आता दरात किरकोळ सूट…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता उलट जनतेची माफी मागा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने केली घोषणा

पेट्रोल आणि डिझेलचे भाव अल्पसे कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यावरून सरकारला धारेवर धरतांना चार वर्ष लूट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे.

गुजरात राज्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली असताना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

याआधी पेट्रोल-डिझेलची प्रचंड दरवाढ, महागाई यामुळे जनतेचा पारा चढला आहे, हे लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने दरवाढ कमी करण्यासाठी गुरुवारी मोठा निर्णय घेण्यात आहे. केंद्र सरकारकडून 2.50 रुपये करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकाराने देखील 2.50 रुपये कमी करणार असल्याची घोषणा केली आहे.