
‘पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणार्या भाजपाच्या आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातील वक्तव्यावर भाजपाचे आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर राजकीय पटलावर जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले असून राष्ट्रवादीकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय… https://t.co/DtEgVUYXCd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 2, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.



























































