धनंजय मुंडे यांचा भुसे व सत्तारांना धक्का, संशोधन केंद्राची पळवापळवी

राष्ट्रवादीचे नेते काम करू देत नाहीत, अजितदादा निधी देत नाहीत असा आरोप करत शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आता पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या मनमानीचा सामना करावा लागत आहे. दादा भुसे व अब्दुल सत्तार यांनी लातूरात लाल कंधारी गोवंश व सोयाबीन संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आताचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बदलला आहे.

लातूर येथे होणारे लाल कंधारी गोवंश व सोयाबीन संशोधन केंद्र आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघात होणार असल्याचे जाहीर केले आहे. धनंजय मुंडे यांनी मराठवाडा येथे झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने दादा भुसे व अब्दुल सत्तार यांना धक्का बसला आहे.

संपूर्ण देशात सोयाबीन सर्वात जास्त सोयाबीन लातूरात पिकवला जातो. दोन वर्षांपूर्वी लातूरच्या कृषी महाविद्यालयात सोयाबीन परिषद झाली होती. त्या परिषदेत सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे अशी मागणी करण्यात आलेली. त्याला तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यासाठी सकारात्मकता दाखवली होती.. माजी कृषी मंत्री सत्तार यांनीही लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र व्हायला हवे असे मत व्यक्त केले होते. धनंजय मुंडे कृषी मंत्री होताच त्यांनी हे केंद्र परळीला हलवले आहे.