
टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. धनश्री वर्मा हिने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून चहल हे आडनाव हटवले होते. त्याचवेळी चहलनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘न्यू लाईफ लोडिंग’ असे स्टेटस ठेवल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. या दोन्ही पोस्टचा संबंध लावत नेटकऱ्यांनी अक्षरश: बाजार उठवला होता आणि दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या अफवाही उठवल्या. काही फेक अकाउंटवरून यासंदर्भात ट्विटही करण्यात आले. परंतु आचा चहल आणि धनश्री यांनी दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे म्हटल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
धनश्री वर्मा हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे डान्स करू शकत नसल्याचे म्हणते. डॉक्टरांनी सांगितलंय की डान्स पुन्हा करायचा असेल तर शस्त्रक्रिया आवश्यक आहे. परिस्थिती अनुकूल नव्हती. खुप आव्हानात्मक परिस्थिती होती. पण माझा पती युझवेंद्र चहल आणि त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला, असे धनश्री वर्मा हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच गुडघ्याच्या दुखापतीमुळे माझा आत्मविश्वास डगमगायला लागला होता. पण या कठीण परिस्थितीमध्ये मला माझा पती, कुटुंब आणि जवळच्या मित्रांची साथ मिळाली. अशा परिस्थितीत मला सर्वांच्या पाठिंब्याची गरज होती. कारण, जर आयुष्यात पुन्हा मला डान्स करायचा असेल तर शस्त्रक्रिया करावी लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याच नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. परिस्थिती कठीण असताना काही लोकांनी अफवा पसरवायला सुरुवात केली. हे सर्व ऐकणे माझ्यासाठी सोपे नव्हते, मला खुप वाईट वाटले, असेही धनश्रीने म्हटले.
View this post on Instagram
2020 मध्ये लग्न
दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी ऑगस्ट 2020 मध्ये साखरपुडा आणि डिसेंबर 2020 मध्ये सप्तपदी घेतली. धनश्री ही व्यवसायाने डेंटिस्ट असून डान्सची अकादमीही चालवते. याच अकादमीमध्ये युझवेंद्र आणि धनश्री यांची पहिली भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर पुढे प्रेमात आणि नंत लग्नात झाले.





























































