
तमिळ सुपरस्टार धनुष त्याच्या अभिनय आणि स्टाईलने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकून घेतो. धनुष गेले काही दिवस हॉलिवूडमधील प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. हॉलिवूडचे काम संपवून तो नुकताच परतला आहे. आता धनुष चर्चेत आलाय तो त्याच्या आलिशान घरामुळे. सुपरस्टार रजनीकांत हे धनुषचे सासरे आहेत. चेन्नईतील पॉईस गार्डन येथे म्हणजेच सासऱयांच्या घराशेजारी धनुषचे घर असेल. अशीही चर्चा आहे की, धनुष या घरासाठी 150 कोटी रुपये खर्च करणार आहे. 19 हजार स्क्वेअर फुटावर बांधण्यात येणारे घर चार मजल्यांचे असेल. स्विमिंग पूल ते जिमपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा हा भव्यदिव्य बंगला असेल. नुकतेच या जागेचे भूमिपूजन झाले.
धनुषच्या वर्पप्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘द ग्रे मॅन’ या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. ही धमाकेदार अॅक्शन सिरीज असून त्यात रायन कोसलिंग आणि क्रिस एवांस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असतील. धनुषच्या तमिळ सिनेमाचे शूटिंगही सुरू होणार आहे. कार्तिक नरेन हे त्या सिनेमाचे दिग्दर्शन करतील.


























































