धारावीत कोरोनाला उतरती कळा, दिवसभरात 18 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत आठवडाभरात रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी झाली असताना आता ही संख्या घटून 20 च्या खाली आली आहे. धारावीत आज 18 रुग्ण सापडले असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 188 दिवसांवर पोहोचला तर गेल्या सात दिवसांत रुग्णसंख्या केवळ 0. 86 टक्क्यांनी वाढली आहे.

दादर, माहीममध्येही रुग्णसंख्या घटली

धारावीप्रमाणे दादर आणि माहीममध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दादर आणि माहीममध्येही एप्रिलच्या मध्यापर्यंत प्रत्येकी 100 च्या पुढे रुग्णसंख्या गेली होती, मात्र गेल्या काही दिवसांत त्यात घट झाली असून दादरमध्ये आज 36 तर माहीममध्ये 30 रुग्ण सापडले.

अशी घटली रुग्णसंख्या

27 एप्रिल – 18
26 एप्रिल – 25
25 एप्रिल – 37
24 एप्रिल – 28
23 एप्रिल – 50
22 एप्रिल – 44
21 एप्रिल – 30
20 एप्रिल – 45
19 एप्रिल – 42
18 एप्रिल – 50