गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी एक लाख अथवा आयफोनची मागणी,  पोलीस निरीक्षक लाच घेताना ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुन्ह्यातील कलम कमी करून देतो असे सांगत मोबदल्यात एक लाख रुपये अथवा आयफोनची मागणी करणारा धारावी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक लटकला. संबंधिताकडून तडजोडीअंती 40 हजारांची लाच घेताना विजय माने (53) हे निरीक्षक ऍण्टी करप्शन ब्युरोच्या ट्रपमध्ये रंगेहाथ सापडले.

विजय माने यांच्याविरोधात ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार देणारा व्यक्ती व त्याच्या आईविरोधात धारावी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुह्यात त्यांना अटक होऊन ते सध्या जामिनावर आहेत. मात्र विजय माने यांनी त्या व्यक्तीला गुह्यातील कलम कमी करून देतो, पण मोबदल्यात एक लाख किंवा आयफोन घेऊन दे अशी गळ घातली. मात्र लाच द्यायची नसल्याने त्यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे माने यांच्याविरोधात तक्रार दिली. ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता विजय माने यांनी तडजोडीअंती 40 हजार स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानुसार शुक्रवारी माने यांना 40 हजार रुपये घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.