
धुळे जिह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाकडील नोंदी लक्षात घेता आजवर जिह्यात 835 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिह्यातील पावसाची सरासरी 645 मिलीमीटर आहे. सरासरीच्या तुलनेत 190 मिलीमीटर पाऊस जास्त झाला आहे. पांझरा उगमस्थानावर पुन्हा पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार अक्कलपाडा धरणातून रविवारी सकाळी 4 हजार 300 क्सुसेस पाण्याची विसर्ग होत आहे. धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने खळणारी पांझरा पाहण्यासाठी धुळेकरांनी पुलांवर गर्दी केली होती.
जिह्यात यंदा तीन वर्षांनंतर समाधानकारक पाऊस झाला. गेल्या तीन वर्षांत पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. दुष्काळ असताना उन्हाची तीव्रता वाढीस लागली. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. या पार्श्वभूमीवर यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. जिह्यात शनिवारी सर्वत्र पाऊस झाला. धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. पांझरेतून खळखळणारे पाणी पाहण्यासाठी रविवारी धुळेकरांनी पुलांवर गर्दी केली होती.
पाणीदार धुळे
धुळे जिल्हय़ातील बारा मध्यम प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झाला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये 265.28 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. एकूण क्षमतेच्या 71.24 टक्के पाणीसाठा निर्माण झाल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. धुळे तालुक्यातील मुकटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेइतका भरला आहे. मुकटी धरणात 10.19 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. धुळे जिल्हय़ातील 47 लघु प्रकल्पांमध्ये 100.62 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 82.50 टक्के आहे.
आजपर्यंतचा सर्वाधिक पाऊस
धुळे तालुक्यात 8, शिंदखेडा तालुक्यात 6, शिरपूर तालुक्यात 19 तर साक्री तालुक्यात 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी असलेल्या नोंदी पाहता धुळे तालुक्यात आजवर 603 मिलीमीटर, साक्री तालुक्यात 634, शिंदखेडा तालुक्यात 863 तर शिरपूर तालुक्यात एक हजार 242 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सरासरीचा विचार करता आजवर जिह्यात 835 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिह्याची सरासरी 645 मिलीमीटर आहे. सरासरीपेक्षा आजपर्यंत 190 मिलीमीटर जास्त




























































