धूत ट्रान्समिशनचा आयपीओ – पहिल्याच दिवशी 63 टक्के सबस्क्राईब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनांना लागणारे महत्त्वाचे भाग उत्पादन करणारी कंपनी धूत ट्रान्समिशन लिमिटेडच्या 3066.89 कोटी रुपयांच्या आयपीओला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिला. आयपीओ पहिल्याच दिवशी 63 टक्के सबस्क्राईब झाला आहे. हा आयपीओ आज खुला झाला असून 829 ते 871 रुपये प्रति शेअर एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. आयपीओ 12 ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे.

आयपीपूर्वी कंपनीने प्रमुख गुंतवणूकदारांकडून 918 कोटी रुपये उभारले आहेत. यासाठी 871 रुपये प्रति शेअर या दराने 1 कोटी 05 लाख शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. आता आयपीओमधून 3066 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. धूत ट्रान्समिशनच्या आयपीओला ब्रोकरेज कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विविध ब्रोकरेज कंपन्यांनी या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. कंपनी पेट्रोल-डिझेलसह ईव्हींसाठी वायरिंग हार्नेस, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक पंट्रोलर्स, ऑटोमोटीव्ह स्विचेस, बॅटरी पॅक इत्यादींचे उत्पादन करते.