धुळय़ाचा पारा 40 अंशांवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुळे शहरात तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेला आहे. त्याचवेळी हवा शुष्क झाल्यामुळे उन्हाची दाहकता जाणवू लागली आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना टोपी, रुमाल, छत्राची मदत घ्यावी लागत आहे. तापमानात वाढ झाली असली आणि संचारबंदी जरी असली तरी कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडावेच लागत आहे. उन्हाच्या दाहकतेपासून बचाव करण्यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. त्यामुळे निर्मनुष्य रस्ते, उन्हाची तीव्रता, व्यावसायीकांची हतबलता, असे वेगळेच चित्र सध्या धुळे शहरात पाहावयास मिळत आहे.