
लोकसभा आणि महाराष्ट्राच्या निवडणूकीत मतदार चोरीविरोधात आज निवडणूक आयोगाविरोधात धुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जोरदार निदर्शने केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे मतदान चोरीचे ठोस पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. त्यांनी त्यासाठी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाची माहिती दिली. हे केवळ एकाच मतदारसंघातील नसून महाराष्ट्रातील अशा अनेक मतदारसंघात असे प्रकार घडल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. ओपिनियन, एक्झिट पोलचे अंदाज कसे चुकतात? याबाबत राहुल गांधींनी आकडेवारी सादर करत निवडणूक आयोगाची पोलखोल केली. याचाच निषेध करत धुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वात उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, आदींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या भुमिके विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.