ग्राहकांच्या खिशाला आग, पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
petrol-dispencer

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्नाटक निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानं सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागण्यास सुरुवात झाली आहे. आज मंबईत पेट्रोलसाठी ८५.३३ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ७३.७४ रुपये प्रति लिटर इतकी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांच्य खिशाला मोठा फटका बसत आहे.

मुंबईत रविवारी पेट्रोलचा दर ८५.२० रुपये इतका होता. तर आज ०.१३ पैशांनी दर वाढून ८५.३३ प्रति लिटर इतका झाला आहे. डिझेलसाठी रविवारी प्रति लिटर ७३.५९ इतके रुपये मोजावे लागत होते. ज्यामध्ये आज ०.१५ पैशांची भर पडली असून ७३.७४ रुपये प्रति लिटर इतका दर झाला आहे.

दिल्लीचा विचार करायचा म्हटलं तर तिथे डिझेलच्या दराने रेकॉर्ड तोडला आहे. आज दिल्लीत ६९.४६ प्रति लिटर दराने डिझेलची विक्री सुरू आहे. काल हा दर ६९.३२ पैशे इतका होता.

delhi-diesel-price

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अशीच होत राहिली तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर पडेल. या दर वाडीमुळे महागाई आणखी वाढेल अशीच चिन्ह सध्या पाहायला मिळत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि घसरत जाणारा रुपया यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या दरांवर त्याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या डॉलच्या तुलनेत रुपया सत्तरी पार पोहोचला आहे. तुर्कस्तानमधील आर्थिक संकटामुळे रुपया संकटात सापडला आहे. या सगळ्याचा परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे.