
जे दुकानदार, व्यापारी ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देणार नाहीत त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भराव लागणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना राबवल्या आहेत. त्यापैकी सरकारने भीम ऍपही लॉन्च केले होते. परंतु बर्याच वेळेला दुकानदार आणि व्यापारी ऑनलाईन पेमेंट घेण्यास नकार देतात. त्यामुळे सरकारने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.
ज्या संस्थेचा वर्षाची आर्थिक उलाढाला 50 कोटींपेक्षा जास्त आहे अशा व्यापारी आणि दुकानदारांनी ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देणे सरकारने अनिवार्य केले आहे. असे न केल्यास व्यापार्यांना दिवसाला 5 हजार रुपयांचा दंड आकारणार आहेत.
सरकारने एक सूचना जाहीर केली असून त्यांना ही सेवा देण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला आहे. 1 फेब्रुवारी 2020 पासून हा नियम लागू होणार आहे.

























































