नरेंद्र मोदी हे नालायक, दिग्विजय सिंहांची जीभ घसरली

30
digvijay-singh

सामना ऑनलाईन । भोपाळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व भोपाळचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत त्यांना नालायक म्हटले आहे. त्यांच्या या टीकनेनंतर भाजप काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार आहे. यावेळी त्यांनी मोदींना शनी देखील म्हटले आहे. मध्य प्रदेशमध्ये एका सभेत भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘देश चालवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे. हिंदू, मुस्लीम शीख, ईसाई सर्वच या देशाचे नागरिक आहेत. ते लोकं बोलतात की हिंदू धर्म धोक्यात आहे. अरे नालायक मानसांनो 550 वर्ष मुसलमांनांनी आपल्यावर राज्य केले. ते आपल्या धर्माचं काही बिघडवू शकले नाही. तर आता काय बिघडणार आहे. आपला धर्म काय इतका कमजोर आहे का जो कुणाच्या बोलण्याने बिघडेल’,असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. तसेच यावेळी त्यांनी मोदींना शनी देखील म्हटले असून शनीचा हा प्रभाव लवकरच देशावरून दूर होणार आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या