सुरतच्या व्यापाऱ्याने तयार केला हिरेजडीत मास्क

719

कोरोना व्हायरसमुळे सध्या मास्क घालणे हे सक्तीचे झाले आहे. मास्कचा देखील एक फॅशन ट्रेंड आला आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मास्क उपलब्ध आहेत. काही हौशी लोकांनी स्वत:साठी चांदी व सोन्याचे मास्क बनवले आहेत. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात सुरत मध्ये एका हिरे व्यापाऱ्याने हिरे जडीत मास्क तयार केला आहे. या मास्कची किंमत दीड ते चार लाख रुपये आहे.

दीपक चोक्सी असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ‘जसा लॉकडाऊन संपला त्यानंतर लग्नसराई सुरू झाली. त्यानंतर अनेकजण आमच्याकडे आले व त्यांनी चांगल्या मास्कची मागणी केली. खासकरून नवरा नवरीसाठी चा्ंगल्या मास्कची मागणी केली. त्यामुळे आम्ही आमच्या डिझायनरकडून हे मास्क तयार करून घेतले. हे मास्क अमेरिकन डायमंडपासून तयार करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी वापरलेला कपडा देखील कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागतो तसा वापरण्यात आला आहे’, असे दीपक चोक्सी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या