दिंडोशीत दोन हजार गणेशभक्तांना कोरोना कवचाचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्यावतीने दिंडोशी विधानसभा मतदारसंघात दोन हजार घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक पिशव्यांसोबत पूजा साहित्यांचे व कोरोना कवचाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे भाविकांसह सार्वजनिक गणेश मंडळांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, देशभरात सणउत्सावांवर बंधने आहेत. मुंबईतही गर्दी टाळून सामाजिक अंतर आणि सामाजिक भान राखत सण उत्सव साजरे करण्यास मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्यावतीने दिंडोशी विधानसभेतील दोन हजार घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक पिशव्यांसोबत आरती संग्रह, पूजा साहित्य, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या या काळात आरोग्याची काळजी घेणाऱ्या उपाययोजना आणि मानसिक व आध्यात्मिक बळ वाढवणाऱ्या शक्तींचा समन्वय असणे आवश्यक आहे, यासाठी कोरोना कवचाचा समावेश असलेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.