‘हृदयात समथिंग समथिंग’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हृदयात समथिंग समथिंग’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे शुक्रवारी हृदयविकारामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रवीण यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रवीण कारळे हे नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते. वयाच्या चौथ्या वर्षी प्रवीण यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. अगदी लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांचा रंगमंचाशी त्यांचा जवळचा संबंध होता. ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’ हे प्रवीण कारळे यांचे लोकप्रिय चित्रपट आहेत.