
दिग्दर्शकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन गरजेचे!
विशाल देवरुखकर…मराठीतला नव्या दमाचा दिग्दर्शक… धारावीतल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या विशाल याने बालनाट्य, एकांकिका ते दिग्दर्शक असा यशस्वी पल्ला गाठला आहे. ‘बॉईज 2’ मधून तो पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमाच्या यशाची मोठी जबाबदारी दिग्दर्शकावर असते. निर्मात्याला कसा फायदा होईल याचाईचार दिग्दर्शकांनी करायला हआआ, असे विशाल सांगतो.
‘बॉईज 2’ करताना दडपण होते का?
होय. सिखआल असल्यामुळे प्रेक्षकांच्या, निर्मात्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे तितक्याच ताकदीचा विषय मांडण्याचे दडपण माझ्यावर होते. लेखक हृषिकेश कोळी याच्यामुळे माझ्यावरचं दडपण कमी झाले. कॉलेजविश्वावर आजवर अनेक सिनेमे आले आहेत त्यामुळे त्यात नवीन काय दाखवायचं? असा आमच्यापुढे प्रश्न होता. चार महिने विचार केल्यानंतर आम्ही एक गोष्ट तयार केली. कॉलेज विश्वातील आजवरची सर्वात वेगळी गोष्ट दाखवण्याचा आम्ही प्रयत्न ‘बॉईज 2’ मधून केला आहे.
या क्षेत्राकडे कसा वळलास?
माझा जन्म धारावीतील सर्कसामान्य कुटुंबात झाला. धारावीत जे शिकायला मिळाले ते आयुष्यात कुठेच शिकायला मिळणार नाही. कारण तिथे सगळी खरी माणसं राहतात. या क्षेत्राशी आमचा काडीमात्रही संबंध नव्हता. लहानपणी मी बालनाट्य स्पर्धेत भाग घ्यायचो. पुढे चेतना कॉलेजात एकांकिका स्पर्धेत सहभागी क्हायचो. त्यावेळी अभिनय करण्याची खूप इच्छा होती, पण मला नेहमी बॅकस्टेजला काम करायला मिळाले. पुढे तब्बल 20 सिनेमांत मी असिस्टंट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ‘बॉईज’ या सिनेमातून मी दिग्दर्शकीय पदार्पण केले. गेल्यावर्षीच्या ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी ‘बॉईज’ एक होता, हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
नवोदित दिग्दर्शकांसाठी टीप्स
प्रत्येक दिग्दर्शकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असायला हवा. सिनेमावर आपलेच पैसे खर्च होत आहेत हे समजून काम करायला हवे. आपल्याला काय आवडते? यापेक्षा प्रेक्षक कशाला पसंती देतील याचा विचार करावा. या क्षेत्रात लंबी रेस का घोडा व्हायचे असेल तर नीट अभ्यास करूनच पदार्पण करा, असे मी सांगेन.
आगामी प्रोजेक्टविषयी…
‘बॉईज 2’नंतर ‘बॉईज 3’चा विचार सुरू आहे. मराठीत मुलींचं भावविश्व मांडणारे सिनेमे अभावानेच येतात. त्यामुळे 18 ते 25 वयोगटांतील मुलींचं भावविश्व मांडणारा ‘गर्ल्स’ हा सिनेमा तयार करण्याचादेखील माझा विचार आहे.





























































