दिव्यांगांना घरबसल्या मतदान करता येणार

वयोमान, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ व दिव्यांगांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान पेंद्रापर्यंत जाणे कठीण होते. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. येत्या निवडणुकीत 80 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी ‘घरातून मतदान’ हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानुसार त्यांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम निवडणूक आयोगातर्फे प्राधान्याने राबविण्यात येत आहे.