दिशा सालियनच्या आत्महत्येआधी काय घडलं, मित्राने केला मोठा खुलासा

2700

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केलेली. सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सुरू असताना दिशाच्या आत्महत्येचं गूढ देखील अद्याप कायम आहे. दिशाने आत्महत्या का केली याबाबत काहीच समोर आलेले नाही. दरम्यान आता दिशाच्या एका मित्राने आज तकला मुलाखत दिली असून त्यात त्याने काही खुलासे केले आहेत.

मी दिशा सालियनला आयुष्यात कधी भेटलो नव्हतो, सूरज पांचोलीचे स्पष्टीकरण

‘दिशाने आत्महत्या केली त्या रात्री दिशा तिचा होणारा नवरा रोहन, मित्र हिमांशू, नील, दीप यांच्यासोबत घरातच पार्टी करत होती. त्या रात्री आम्ही ड्रिंकही करत होते. ड्रिंक केल्यानंतर नेहमी दिशा इमोशनल होते तशीच त्या दिवशीही झाली होती इमोशनल झालेली दिशा त्या रात्री रडायला देखील लागली होती. रडता रडता कुणीच माझी काळजी करत नाही असे बोलत होती. त्यानंतर दिशा तिच्या एका मैत्रिणीसोबत लॉकडाननंतर काय काय करूया यावर चर्चा करत होती. त्यानंतर तिने तिच्या अमेरिकेतील मित्राला फोन केला व त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर पुन्हा ड्रिंक करायला बसल्यानंतर दिशा रडू लागली. ते पाहून हिमांशूने तिला रडून पार्टीचा मूड खराब करू नको असे सांगितले. त्यामुळे दिशा तिच्या रूममध्ये निघून गेली. मात्र बराच वेळ दिशा रुममधून बाहेर न आल्याने आम्ही दरवाजा ठोकवला. मात्र दिशाने दरवाजा न खोलल्याने आम्ही दरवाजा तोडला. पण दिशा रुममध्ये नव्हतीच. त्यानंतर दीपने गॅलरीतून खाली पाहिले तर दिशा खाली पडलेली होती. आम्ही सर्व धावत खाली गेलो. दिशाच्या हृदयाचे ठोके सुरू होते त्यामुळे आम्ही तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले, असे तिच्या मित्राने या मुलाखतीत सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या