
डिस्ने+हॉटस्टारने आपल्या ग्राहकांनी नवीन 499 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार ग्राहकांना डिस्ने हॉटस्टारवरील सर्व कार्यक्रम आणि चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. इतकेच नाही तर डिस्ने+हॉटस्टारने आणखी एक 899 रुपयांचा प्लॅन आणला आहे.
डिस्ने हॉटस्टारने आपला जुना ३99 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. त्या ऐवजी ग्राहकांसाठी 499 रुपयांचा प्लॅन आणला आहे. 499 च्या मोबाईल प्लॅन असून 899 रुपयांच्या सुपर प्लॅन आहे. नेटफ्लिक्सच्या धर्तीवर डिस्ने+हॉटस्टारने हा 499 मोबाईल प्लॅन आणला आहे. त्यात युजरला फक्त मोबाईलवर डिस्ने+हॉटस्टारच्या कार्यक्रम आणि चित्रपट पाहता येणार आहे.
तर 899 रुपयांच्या सुपर प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन डिवाईसमध्ये ऍप वापरण्याची मुभा असणार आहे. परंतु या प्लॅनमध्ये चित्रपट आणि मालिका पाहताना जाहिरात असणार आहे. इतकेच नाही तर 499 आणि 899 च्या प्लॅनमध्ये ग्राहकाना प्रिमियम मध्ये मिळणार्या हाय क्वालिटी स्क्रीन आणि ऑडियोच्या सुविधाही मिळणार नाहिये.
डिस्ने+हॉटस्टारने आपला 1499 चा आपला प्रिमियम प्लॅन तसाच ठेवला आहे. पूर्वी हॉटस्टार प्रिमियम प्लॅन 999 इतक होता. डिस्ने आणि हॉटस्टार एकत्र आल्यानंतर या ओटीटीवर आशयही वाढला आणि त्याची किंमतही 1499 वर पोहोचली आहे.

























































