
शिवसेना मागाठाणे शाखा क्र. 12च्या वतीने वितरित करण्यात येणाऱ्या गणपती पूजा सामग्री आणि आरती संग्रहाचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ येथे करण्यात आले. या वेळी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, सचिव विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार ऍड. अनिल परब, विधानसभा प्रमुख अशोक म्हामुनकर, राजू मुल्ला, योगेश भोईर व माधुरी भोईर, तुकाराम पालव, सारिका झोरे, शाखा संघटक माधुरी खानविलकर, इतिश्री महाडिक व आयोजक मागाठाणे विधानसभा निरीक्षक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे उपस्थित होते.
युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक व विभाग अधिकारी नीलेश बडदे यांच्या वतीने गणेश पूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या पूजा संचाचे अनावरण शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त अमोल भिंगार्डे आणि युवासेना विधानसभा चिटणीस सुयश साटम यांच्या वतीने गणेश पूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाटील, युवती विभाग अधिकारी मानसी गोडांबे आदी उपस्थित होते.