मैत्री चिरायु होवो! मैत्रिणीच्या स्मरणार्थ स्टार्टअप; 200 महिलांना मिळतोय रोजगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्याला कधी, कुठे आणि कसं वळण लागेल सांगता येत नाही. 43 वर्षांची दिव्या राजपूत आज ऑर्गेनिक उत्पादनांचे स्टार्टअप चालवत आहे. जिवलग मैत्रिणीचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर दिव्याने या कामाला सुरुवात केली. दिल्लीची दिव्या 20 वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्रात काम करत होती. ते क्षेत्र सोडून ती चार मैत्रिणींसोबत ऑर्गेनिक उत्पादनांची ऑनलाइन विक्री करत आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या व्यवसायातून दोनशे महिलांना रोजगार मिळतोय.

दिव्याने आपली मैत्रीण काकुल रिझवी हिच्यासोबत स्टार्टअप सुरू केला होता. दुर्दैवाने काही दिवसांत काकुलचे कॅन्सरने निधन झाले. दिव्यासाठी हा मोठा धक्का होता. त्या दिवसापासून फक्त ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरेन असा निर्धार दिव्याने केला आणि स्टार्टअप सुरूच ठेवला.

सुरुवातीला दिव्याने प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री सुरू केली. मात्र लॉकडाऊनमध्ये त्याला खीळ बसला. मग तिने स्वतःची वेबसाईट लाँच केली. स्थानिक कारागीर आणि शेतकऱयांशी भागीदारी करून ती ज्यूट, कॅनव्हास बॅग, हर्बल इम्युनिटी बूस्टर, सौंदर्यप्रसाधने अशा 100 वस्तूंचे उत्पादन करत आहेत.