
सामना प्रतिनिधी, नगर
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांना आधार मिळावा, यासाठी राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते नगर तालुक्यातील अकोळनेर, खंडळा येथील छावणीतील शेतकऱ्यांना गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले.
रावते यांनी अकोळनेर येथील जनावरांच्या छावणीस भेट दिली. यावेळी राज्य विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी, माजी राज्यमंत्री अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सभपती रामदास भोर, तहसीलदार रोहिणी नर्हे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे, प्रभारी गट विकास अधिकारी वसंतराव गारुडकर आदि उपस्थित होते.
रावते म्हणाले, दुष्काळ हा खरीप हंगाम संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. पहिल्या जनावरांच्या छावण्या लवकर सुरु झाल्या आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्यावर नगर, मराठवाडा अवलंबून असतो. यावेळी नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. छावणीतील जनावरांच्या चारा रक्कमेत वाढ करण्यात आली व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. आचारसंहिता संपल्यावर छावणीतील जनावरांसाठी मुक्कामास असलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून गहू 10 किलो, तांदूळ 5 किलो व डाळ 1 किलो धान्याचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच अकोळनेर व खंडाळा येथील शेतकरी व महिलांशी दिवाकर रावते यांनी संवाद साधला. औटी म्हणाले, पावसाला लाबल्यामुळे छावणीतील पशुधन अडचणीत आहे. तसेच त्यांना संभाळणा शेतकऱ्याला मदत म्हणून गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अकोळनेर व खंडाळा छावणीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































