
दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी महाड येथून आठ पर्यटक आले होते. हे पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना त्यांच्यापैकी तीन युवक समुद्रात बुडाले होते. वाचवा,वाचवा असा आरडाओरडा केल्यानंतर इतरांनी एकाला वाचवले मात्र दोघांचा बुडून मृत्यू झाला
रत्नागिरी जिल्ह्यातील पाळंदे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महाड सुतार सुतारवाडी येथील राकेश पवार, सोहम सकपाळ, राहुल पवार, सोहम सोंडकर, यश पवार, निखिल कोळंबेकर , प्रसंजीत तांबे , दीपक सुतार , 8 मित्र आज आज शनिवारी सकाळी 11 वाजता पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले होते . त्यातील सर्व मित्र समुद्रातील पाण्यामध्ये उतरले , परंतु त्यांना समुद्राचा अंदाज आला नाही, त्यातच आज समुद्राला भरती असल्यामुळे पोहता पोहता या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन मित्र समुद्रामध्ये बुडू लागले, नेमकं काय होतंय याचा अंदाज येण्या अगोदरच यातील दोन मित्र दिसेनासे झाले. परंतु काही वेळाने यातील यश पवार भरतीच्या जोरदार लाटे सोबत सुदैवाने किनाऱ्यावर आला , त्याला स्थानिक हॉटेल व्यवसायिकांनी वाचवले तर दीपक सुतार याचा काही वेळाने मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला. मात्र यातील प्रसंजीत तांबे हा तरुण बेपत्ता झाला होता ,स्थानिक त्याचा शोध घेत आहेत तर सुदैवाने बचावलेल्या यश पवार याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत. महाड येथील सर्व तरुण Mh 06BC 4505 या नंबर च्या मॅक्सिमो गाडीतुन फिरायला आले होते ,महाड़ येथून आलेले सर्व तरुण 16 ते 18 वयोगटातील आहेत , सर्व तरुण नुकतेच 10 व 12 वी ची परीक्षा पास झाले आहेत . मयत दीपक सुतार हा फर्नीचर चे काम करीत होता , बेपत्ता झालेला तांबे 10 वी पास झाला आहे .





























































