नांदेडकरांना दिवाळी पहाटची मेजवानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय, गुरुद्वारा बोर्ड, महानगरपालिका आणि नांदेड सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि सौ. डोंगरे यांच्या हस्ते व निळकंठ पाचंगे, वसंत मैय्या, प्रदीप चाडावार, विजय जोशी, डॉ अच्युत बने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

दिवाळी पाडवा निमित्त ‘राम प्रहर’ या राम कदम यांनी संगीतबध्द केलेल्या मराठमोळ्या गाण्यांचा आणि गजानन पिंपरखेडे यांची संकल्पना आणि विजय जोशी यांची निर्मिती असलेला सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली विविध प्रकारची गाणी, ज्यात भक्तिगीते, भाव गीते, भारुड, लावणी, सवाल जवाब, लोकगीते  सादर करण्यात आली. सलग तिसऱ्या दिवशी ही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दिवाळी पाडवा  असताना सुद्धा बंदा घाटचा परिसर रसिकांनी फुलून गेला होता. योगेश रणमाळे,धनश्री सरदेशपांडे,वर्धिनी जोशी,  विलास  गारोळे, माधुरी पाटील,माधवी पाठक आणि निर्माता विजय जोशी यांनी एकापेक्षा एक सुरस गाणी सादर केली. कार्यक्रमाचे संगीत नियोजन राजू जगदने, शेख  नईम,  सिद्धोधन कदम, आदींनी केले.अॅड. गजानन  पिंपरखेडे यांनी या कार्यक्रमाचे  बहारदार संचलन केले