
सामना प्रतिनिधी । लंडन
गतविजेता नोवाक जोकोविचने टेनिस कोर्टवर जबरदस्त खेळ करताना डेव्हिड गॉफीनला सरळ तीन सेटमध्ये पराभूत करीत विम्बल्डन या मानाच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नोवाक जोकोविच याने डेव्हिड गॉफीनवर 6-4, 6-0, 6-2 अशा फरकाने अगदी सहज विजय मिळवला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेतला त्याचा 70 वा विजय ठरलाय. तसेच महत्त्वाच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची ही त्याची 36वी खेप ठरलीय. दरम्यान, अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आर. ऍग्युटने जी. पेलावर 7-5, 6-4, 3-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.




























































