
रमजानचे पवित्र रोजे सुरु असताना कोरोना चाचणी करून घेणे धर्मविरोधी ठरत नाही असा फतवा आज दारुल उलूम देवबंदने काढला आहे. रमजानच्या काळात कोविड-19 चे थैमान जगभर सुरु आहे हे आपले दुर्दैवच आहे. पण आपल्या सलामतीसाठी मुस्लिम नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यायलाच हवी. या चाचणीत आपल्यावर कोणत्याही औषधाचा अथवा रसायनाचा वापर केला जात नाही त्यामुळे रोज्याचे पावित्र्य भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे देवबंदने आपल्या फतव्यात म्हटले आहे.
रमजानचे रोजे सुरु असल्याने या काळात कोरोनाची चाचणी आपल्यावर करून घेणे अपवित्र तर ठरत नाहीना? त्यामुळे आपले रोजे तर तुटत नाही ना? अशा शंका मुस्लिम नागरिकांत होत्या. या शंकांचे निरसन आता देवबंदच्या मुफ्तीन्नी एक फतवा काढला आहे. या फतव्यात देवबंद म्हणते, कोरोना चाचणी एका कंदील लावलेल्या कोरड्या कापसाच्या मदतीने आपल्या नाकातील मळ अथवा घशातील लाळेचा नमुना घेतला जातो. या कापसाला कोणतेही औषध अथवा केमिकल लावलेले नसते. त्यामुळे रोजाच्या काळात तोंडात कोणताही बाहेरचा पदार्थ तोंडात जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा स्थितीत पवित्र रोज तुटण्याची मुळीच भीती नाही.त्यामुळे रोजे ठेवणाऱ्या भाविकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. कारण रमजानच्या काळात आपल्या प्रकृतीची काळजी घेणे महत्वाचे आहे असेही देवबंदने म्हटले आहे.



























































