असं झालं तर… विकासकाकडून फसवणूक झाली तर…

  • घर खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण पै-पै जमा करतात, परंतु कधी-कधी विकासकाकडून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केली जाते.
  • जर तुमची घर खरेदी करताना विकासकाकडून फसवणूक झाली तर सर्वात आधी फसवणुकीची माहिती बँकेला द्या. व्यवहारांबद्दल त्यांना सांगा. पैसे द्यायचे बाकी असतील तर ते द्यायचे थांबवा.
  • विकासकासोबतचे सर्व कागदपत्रे जसे की, विकासकांसोबतचा करार, पेमेंट स्लिप, मेसेजेस आणि अन्य माहिती गोळा करा. हा सर्व पुरावा होऊ शकतो. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा.
  • मालमत्ता खरेदी-विक्रीतील फसवणूक गुंतागुंतीची असू शकते. त्यामुळे योग्य कायदेशीर मार्गदर्शनासाठी वकिलाचा सल्ला घ्या. त्यांना सुरुवातीपासूनची माहिती सांगा.
  • जमीनदार किंवा बिल्डर यांच्याकडून नोंदणीकृत लेखी करार आधीच करून घ्या. ज्यात सर्व अटी व शर्थी स्पष्टपणे लिहिलेल्या असतील. त्यामुळे तुमची फसवणूक थांबू शकते.