मासे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे का?

मासे खाणं तब्येतीला चांगलं की वाईट यावर अनेकदा चर्चा होत असतात. आहारातील पोषक अन्न म्हणून मासे खाल्ले जातात. माशांमध्ये कोणती पोषक तत्त्वे असतात त्यामुळे चवीबरोबरच त्या पोषक घटकांचाही शरीराला फायदा होतो.

– गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी आठवड्याला केवळ दोनच वेळा मासे खावेत. स्त्रियांचे आरोग्य आणि बाळाच्या वाढीसाठी मासे खाणं खूप फायदेशीर ठरतं. तसेच त्यांनी आवडतात म्हणून अति जास्त प्रमाणातही मासे खाऊ नयेत.

– डोळे आणि ह्रदयाशी संबंधित समस्यांकरिता मासे खाणे हे एक उत्तम औषध सांगितले जाते. मासे खाल्ल्याने डोळे चांगले राहतात आणि त्यांची क्षमता वाढते.

– माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे प्रथिनांसाठी मासे खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

– जीवनसत्त्व डी चा मासे हा मोठा स्त्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री- फॅटी अॅसिड असते जे आपल्या मेंदूच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत.

– आयोडीन ते विविध जीवनसत्त्व आणि मिनरल्स यांची कमतरता भरून निघते. माशांमध्ये जीवनसत्त्व डी भरपूर प्रमाणात असते.

– ओमेगा थ्री फॅटी अॅसिड रोजच्या जेवणातून मिळत नाही. त्यासाठी सप्लिमेंट घ्यावे लागतात. त्यापेक्षा मासे खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

– हार्ट अॅटॅक , स्ट्रोक यासारखे ह्रदयविकाराशी संबंधित त्रास दूर होण्याकरिता मासे खाणं हा पर्याय सांगितला आहे.

– म्हातारपणी मेंदूच्या पेशी निकाम्या होतात. अल्झायमर डिसीजची शक्यता असते. अशा वेळी जे लोक नियमितपणे मासे खातात त्यांच्या शरीरात मेंदूच्या मृत पेशी नष्ट होण्याची प्रक्रिया मंदावते.

– लहान मुलांनी नियमित मासे खायला घातले तर त्यांना दमा होत नाही.

– आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मासे खाल्ले पाहिजेत असे आहारतज्ञ सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या