घरात कुत्रे पाळा आणि हार्ट अटॅक टाळा!

2514

घरात एखादा पाळीव प्राणी असावा अशी अनेकांची इच्छा असते. पण, प्राण्यांची नियमित निगा, त्यांचा खर्च आणि मोठ्या जागेचा अभाव यांमुळे अनेक जण ही इच्छा मनातच ठेवतात. पण, असे प्राणी पाळणं तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

अमेरिकने हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात हे नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानुसार, कुत्रे पाळणाऱ्या व्यक्तिचं आयुर्मान अधिक असू शकतं. याचं मुख्य कारण त्यांना हृदय विकार आणि स्ट्रोकचा धोका कमी असतो. विशेषतः ज्या व्यक्ती एकट्या राहतात, त्यांच्यासाठी कुत्रे हा उत्तम सहकारी ठरू शकतो, असं अहवालात म्हटलं आहे.

या अहवालासाठी तब्बल 38 लाख लोकांच्या जीवनशैलींचा अभ्यास केला. त्यात असं निष्पन्न झालं की कुत्रे पाळणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होण्याची शक्यता 24 टक्क्यांपर्यंत घटते. तसंच, ज्यांच्याकडे कुत्रा आहे, असे लोक ताणाशी चांगल्या प्रकारे सामना करू शकतात, असंही निदर्शनाला आलं आहे. कामाचा ताण वाढल्यानंतर, जी माणसं घरच्या कुत्र्यासोबत वेळ व्यतित करतात, त्यांच्या मनात ताण साचून राहत नाही, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या